राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेत गटबाजीचे ‘राजकारण’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने आगामी विधानसभेच्या तयारीला सुरू केली आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने ‘जन अशीर्वाद’ यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढला. त्यानंतर भाजपाने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आणि इतर पक्षातील नेत्यांना भाजपात प्रेवश देण्यासाठी ‘महाजनादेश’ यात्रा सुरु केली आहे. भाजपाच्या ‘महाजनादेश’ यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने ‘शिवस्वराज्य’ यात्रा काढली आहे. या यात्रेचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करत असून शिवनेरी किल्ल्यावरून ही यात्रा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेत गटबाजीचे राजकारण दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनाबाबत अनेक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याचे समोर येत आहे. राज्यात भाजपा-शिवसेनेच्या यात्रा सुरु असतानाच राष्ट्रवादीने ही यात्रा सुरु केली आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना या यात्रेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावरून महराजांचे आशिर्वाद घेऊन यात्रेला सुरुवात केली. यावेळी धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कोल्हे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्याच शहरात लोक सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य निर्माण व्हावे यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. पक्षाला गळती लागली आहे असे बोलले जाते. यावर बोलताना ते म्हणाले, पक्षाला गळती लागलेली नाही. वर काही झालं तरी खालच्या विटा मजबूत असल्यावर फरक पडत नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आरोग्यविषयक वृत्त –