अजित पवारांबद्दल राष्ट्रवादीनं निर्णय घ्यावा, ‘महाविकास’च्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अजित पवारांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारत भाजपाबरोबर हातमिळवणी केली होती. तेव्हा अजित पवारांवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून टीका देखील झाली होती आणि स्वतः शरद पवारदेखील त्यांच्या या निर्णयाविरुद्ध होते. तेव्हापासून त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची नाराजी होती. म्हणूनच मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची चिन्ह खूप धूसर दिसत होते. या पार्श्वभूमीवर अजित पवारांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

बाळासाहेब थोरात यांना मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे दालन मिळाले आहे. त्यांनी आजपासून कामकाजास सुरुवात देखील केली आहे. त्यांना फडणवीसांबद्दल विचारण्यात आले तर ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते कधीच होत नाही, कारण निवडणुकी दरम्यान फडणवीस म्हटले होते विरोधी पक्ष आता दिसणारच नाही परंतु त्यांना स्वतःलाच आज विरोधी पक्ष नेतेपदी बसावे लागले त्यामुळे राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. तसेच नारायण राणेंबद्दल मी जास्त काही बोलणार नाही असेही ते म्हणाले.

थोरात म्हणाले, मंत्रिमंडळ, खातेवाटपाची चर्चा होणे स्वाभाविक आहे. आज-उद्या ते होईलच, खातेवाटप झाल्यानंतर त्या खात्याचे काम करता येईल. पाच वर्षे सरकार चालवायचे आहे. त्यामुळे यासाठी थोडा वेळ तर जाणारच. तसेच ते पुढे म्हटले की, आढावा बैठकीत मुख्यमंत्री सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक प्रश्नावर चर्चा करीत आहेत. शिवाय त्यांच्यासोबत मंत्री म्हणून काम करण्याचा योग पहिल्यांदाच आला आहे. पण त्यांची काम करण्याची भूमिका प्रामाणिक आहे, असेही ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी काही वेगळी विधाने केली होती त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हटले की, अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तेव्हा त्यांनी काय बोलावे आणि काय नाही हे मला सांगता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like