… तर तोंड लपवण्याची वेळ आली नसती, राष्ट्रवादीचा फडणवीसांना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्यांना 30 मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीला फडणवीस न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून न येता मागच्या दरवाजाने आले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट करून फडणवीस यांना टोला लगावला आहे.

2014 मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस न्यायालयाच्या मागच्या दराने गेल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांचे एक व्यंगचित्र ट्विट करत त्यांना टोला लगावला आहे. या व्यंगचित्रामध्ये फडणवीस एका बॉक्समधून मान बाहेर काढताना दाखवण्यात आले आहे. देवेंद्रजी आता तोंड लपवून काय फायदा आणि आधीच चूक केली नसती तर ही वेळ आली नसती अशा दोन ओळी या फोटोवर लिहण्यात आल्या आहेत. तसेच या फोटोला कॅप्शन देताना त्यामध्ये फडणवीस यांना टॅग करण्यात आले आहे.

यामागे कोण आहे माहित आहे !
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यावरील सर्व गुन्हे हे जनतेसाठी केलेल्या आंदोलनांचे गुन्हे आहेत. वैयक्तिक कारणातून एकही गुन्हा आजवर माझ्यावर दाखल झालेला नाही. त्यामुळे कोणतेही गुन्हे लपवण्याचा प्रश्न येत नाही. ज्या दोन गुन्ह्यांबद्दल माझ्या विरोधात आरोप केले जात आहेत, ते निवडणुकीवर परिणाम करणारे गुन्हे नव्हते. न्यायालयासमोर मी माझं म्हणणं मांडेन. न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या सगळ्यामागे कोण आहे हेही मला चांगलं माहित आहे. योग्य वेळी सांगेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

You might also like