सावळ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  सावळ (ता. बारामती) ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने जय श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलवर ६ विरुध्द तीन असा दणदणीत विजय मिळविला आहे़. पॅनेलप्रमुख सुनीता दत्तात्रय आवाळे आणि पुष्पलता सोमनाथ आटोळे या दोघींना २१७ मते मिळाली मात्र पोस्टल मताने सुनीता आवाळे यांना साथ दिल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

वॉर्ड क्र. १

ज्योती दिपक आवाळे यांना ३३७ मते, सारिका धनंजय आटोळे यांना ३०७ मते, नितीन नारायण भिसे यांना २८६ मते मिळाली़

वॉर्ड क्र.२

मधील विजयी उमेदवार रोहिणी रमेश खोमणे यांना २७२ मते, फक्कड तुकाराम बालगुडे यांना २६२ मते तर तृप्ती जितेंद्र विरकर यांना ३०२ मते मिळाली़ वॉर्ड क्रमांक तीन मधील विजयी उमेदवार चेतन तात्याराम आटोळे यांना २४१ मते, सुनीता दत्तात्रय आवाळे यांना २१८ तर अंजली पोपट आवाळे
यांना २४९ मते मिळाली, असे पॅनेलप्रमुख रमेश रामचंद्र साबळे, संतोष दत्तात्रय आटोळे, दत्तात्रय रामभाऊ आवाळे, राजेंद्र गणपती आटोळे, सोमनाथ महादेव खोमणे यांनी सांगितले.