भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा ‘गौप्यस्फोट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निवडणूका झाल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणास सुरुवात होईल असे दिसत होते. महाशिवआघाडी सत्तास्थापनेच्या मार्गावर असताना अजूनतरी तसे घडताना दिसले नाही. परंतू सर्वच पक्षांनी इतर पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे दावे केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस देखील मागे राहिले नाही. भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

भाजप इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील आमदार पळवेल असे वाटत होते. परंतू येथे असे होताना दिसले नाही. दरम्यान भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. आमच्याकडून चूक झाल्याचे काही आमदार सांगत आहेत. खासगीत सगळेच कबूल करत आहेत. अशा आमदारांना परत यायचे झाल्यास त्या त्या ठिकाणच्या निष्ठावंतांना विचारुनच निर्णय घेण्यात येईल. कोणतेही प्रकल्प थांबणार नाहीत. भाजपकडून जो गैरसमज पसरविण्यात येत आहे तसे काहीही होणार नाही. आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रकल्प राबवू.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, किमान समान कार्यक्रमावर आमची बैठक झाली आहे. वरिष्ठ नेत्यांना या बाबतचा मसूदा पाठवला आहे. महाराष्ट्रातील सर्व घटकांना सामावून घेतील असे मुद्दे यामध्ये आहेत. आजच यावर चर्चा करणे योग्य नाही. भाजपकडे 105 जागा आहेत आणि त्यांनी नेहमीप्रमाणे काही संख्याबळ गोळा केले आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी सरकार स्थापन करावे. आम्हाला आमचे सरकार पाच वर्षे टिकवायचे आहे. त्यावरच आम्ही सध्या विचार करत आहोत. त्यामुळे थोडासा वेळ लागेल. असे जयंत पाटील म्हणाले.

Visit : Policenama.com