शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर सुनिल तटकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मी शिवसेनेत प्रवेश करणार नाही. मी राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या निव्वळ अफवा असून यापुढेही मी कायम शरद पवार यांच्यासोबत पक्षात राहून काम करणार आहे,’ असं म्हणत सुनिल तटकरे यांनी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र स्वत: सुनील तटकरेंनी यांनी सर्व चर्चा फेटाळून लावत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हटलं आहे.

तटकरे यांनी जरी शिवसेना प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी तटकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तटकरेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास हा अजित पवारांसाठी मोठा धक्का होऊ शकतो.

विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीतून अनेक नेत्यांनी काढता पाय घेतला आहे. तटकरे यांचा रायगडमध्ये चांगला प्रभाव आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेला कोकणात विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने फायदाच होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजे यांनी मंगळवारी (ता. २०) रात्री झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते भाजपात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूकांच्या आधी होणारी ही गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी कोणती भुमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –