सुप्रिया सुळेंचे मोठ विधान, म्हणाल्या – ‘जातीपातीचे राजकारण मला महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत कळालं’

पोलीसनामा ऑनलाइन – जातीपातीचे राजकारण मला महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत कळलं. मी ज्या राज्यात लहानाची मोठी झाली तिथे अशी परिस्थिती कधीच नव्हती. पण दिल्लीत मला खासदार तुम्ही ठाकूर, गुज्जर असल्याचे विचारायचे. मी याबद्दल शरद पवारांनाही विचारलं. त्यावर तू काम कर, निवडून आली आहेस ना मग राज्याचे प्रश्न बघ अस सांगायचे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  (supriya sule) यांनी म्हटले आहे. मी त्या काळात गांभीर्याने घेतल नव्हते. पण समाजात अनेकांच्या मनात या गोष्टी रुजल्या आहेत. शिक्षणातून या सगळ्या गोष्टी जातात असे मला वाटायचे असे त्या म्हणाल्या. जातीची ओळख असावी त्यात काही गैर नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने आयोजित एका ऑनलाइन कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी राजकीय पक्ष आणि जात या प्रश्नावर उत्तर देताना आपल मत व्यक्त केले आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, आपण सगळे साक्षर आहोत पण शिकलेलो आहोत का, साक्षर आणि शिक्षणात फार अंतर आहे.

चांगल्या दर्जाच शिक्षण मिळाल असेल तर राज्यात घरगुती हिंसाचार होईल का? सुशिक्षित कुटुंब असेल तर मुलगा व्हावा हा प्रश्नच कुठे येतो. यावर मोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे. त्यानंतर बदल दिसेल, असा विश्वास सुळेंनी व्यक्त केला. जातीची माहिती, एक वेगळी ओळख असणे यात गैर नाही. पण राजकीय घटक शोषण करुन जर त्या राज्यात समतोल बिघडवत असेल तर चिंताजनक आहे. वाढणारी कटुता कोणत्याही राज्य, देश आणि प्रगतीसाठी घातक असल्याचे मत खासदार सुळेंनी व्यक्त केले आहे.

READ ALSO THIS :

Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव

गुन्हा दाखल होताच आमदार महेश लांडगेंनी मुलीचा विवाह माऊलींच्या ‘साक्षी’ने उरकला

Pune : जमीन खरेदी केल्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ; वाकड चौकातील अमित कलाटेला अटक, न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली

Pune : पुण्यात दुपारी 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी ! उद्याने, मॉल्स, थिएटर, जीम अशी गर्दीची ठिकाणे बंदच राहाणार; जाणून घ्या सविस्तर