सुप्रिया सुळेंनी मांडली महाविकास आघाडीची भूमिका, म्हणाल्या – ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही एकाच घरातील दोन मुलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडीच Mahavikas Aghadi सरकार सत्तेत आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपाने हे 3 चाकाचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला होता. दुसरीकडे हे सरकार 5 वर्ष टिकणार असा दावा सत्ताधारी महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जी संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणात होती ती टिकवून ठेण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आहे. आमच्या कोणत्याही नात्यात कटूता नाही. ती येऊ नये यासाठी प्रयत्न असतो, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही एकाच घरातील दोन मुल असल्याने त्यांनी एकत्र येऊन काम करणे अवघड नाही. 15 वर्ष महाराष्ट्रात आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे फार काही वाटलं नाही. तसेच बाळासाहेबांनी आणि पवार साहेबांनी मिळून एक मॅगजिन काढल होतं. जर ते दोघ जर तसा प्रयोग करु शकत असतील तर महाविकास आघाडीच सरकार का होऊ शकत नाही ? असेही सुळेंनी म्हटले आहे.

Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव

महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने आयोजित एका ऑनलाईन कार्यक्रमात खासदार सुळे बोलत होत्या. मी सत्तेचा आणि सरकारचा विचार करत नाही. कारण मला वाटतं लोकप्रतिनिधी काम करताना आपला मतदारसंघ पहिली जबाबदारी असते. सत्ता असू दे किंवा नसू दे त्याचा आपल्या कामाचे मूल्यांकन होता कामा नये. सत्तेत असलो तर ही 5 काम करणार आणि नसलो की काम करणार नाही, हे मला पटत नाही, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील सर्वात जवळचं नातं मी पाहिल ते म्हणजे मनमोहन सिंग आणि शरद पवार यांचे 10 वर्षात त्यांच्या नात्यात कधी पक्ष आलाच नाही, असेही सुळेंनी सांगितले आहे.

आधी सर्वांना महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही, असे वाटत होते, असे त्या म्हणाल्या. भाजपाचा अश्वमेध रोखला किंवा महाविकास आघाडीने पर्याय दिला असे दाखवण्याचा विचार होता का असे विचारले असता, त्या म्हणाल्या की, समविचारी आणि देशाच्या स्थैर्यासाठी हे महत्वाचे होते. देशाचा अभ्यास केला तर मध्य प्रदेशपासून खाली कुठेही भाजपा नाही. मध्य प्रदेशातही तोडून फोडून प्रयत्न केला. उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सोडल तर कुठेही नाहीत, सगळा देश पाहिल्यानंतर 2 राज्य सोडली तर इतर कुठे फार प्रभाव नाही. आसाममध्ये मुख्यमंत्री झाले तरी ते काँग्रेस डीएनएचे झाले. नक्की भाजपा खरी कोणती आहे. त्यांच्या पक्षात इतर बरेच ओळखीचे चेहरे दिसतात. मग या बाजूमध्ये आणि तिथे अंतर काय राहिले. पार्टीत कोणताही डिफरन्स नाही, असा टोला सुळेंनी लगावला आहे. भाजपात गेलेले पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करतायत का? असे विचारले असता त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्ती, लोकप्रतिनिधी त्याचा एक मान सन्मान असला पाहिजे. पक्षांतरात मला पडायचे नाही. महाराष्ट्राचं राजकारण इतकंही हलक करू नये. आज आपण उजवे डावे यातच अडकलो आहोत. गांभीर्य कमी झालं आहे. आपण धोरणांवर कधी वाद घालणार, अर्थव्यवस्था. रोजगार यावर चर्चा कधी होणार. संसद अधिवेशनात यावर चांगलीच चर्चा झाली पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी