…म्हणून उद्धव यांनी ED प्रकरणात राज ठाकरेंची पाठराखण केली – सुप्रिया सुळे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीवर आपली प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला. ‘इडी’ ची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र असून जो सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे’ असे त्यांनी यावेळी म्हटले.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज यांची पाठराखण केल्याच्या मुद्द्यावर देखील प्रतिक्रिया दिली. ‘बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार अजूनही जिवंत आहेत, यामुळेच उद्धव ठाकरेंनी भाऊ राज ठाकरेंची बाजू घेतली,’ असे सुप्रिया सुळेंनी सांगितले.

ED कडून राज यांची आठ तास चौकशी :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर आज ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर तब्बल साडेआठ तास ईडीने त्यांची कसून चौकशी केली असून राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर पडून सरळ कृष्णकुंजकडे रवाना झाले आहेत. कार्यालयातून राज ठाकरे हसतमुख चेहऱ्याने बाहेर पडले असून माध्यमांशी संवाद साधण्यास मात्र त्यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन अधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांची कसून चौकशी केली. चौकशीवेळी त्यांचे कुटुंबीय सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होते.

गरज पडल्यासच पुन्हा चौकशी :
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजची चौकशी संपली असून या प्रकरणातील अन्य आरोपींनी दिलेल्या माहितीशी त्यांनी दिलेली माहिती जुळवून पहिली जाईल. यानंतर त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावले नसून नंतर भविष्यात गरज पडल्यास मात्र चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –