अजित पवारांसोबत तुमचे मतभेद आहेत का ?; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजितदादांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताईचं Supriya Sule फारसं चांगलं नाही असं लोकांना खूप आवडतं चर्चा करायला. यावर अजित पवार आणि आपल्यात कोणतेच मतभेद नसल्याचं खासदार सुप्रियाताईनी Supriya Sule स्पष्ट केलं आहे. सुप्रिया यांनी, “एक तर हे खूप हस्यास्पद आहे. खूप गुळगुळीत विषय आहे हा. मागच्या १४ वर्षांपासून मी खासदार आहे पण कुठल्या धोरणांवर दादाचं आणि माझं वेगळं मत आहे ही चर्चा कुणी पहिली आहे आणि याचा काही डेटा नाही. दादाचं आणि माझं वेगळं मत आहे पण कोणत्या गोष्टीवर याला काही डेटा उपलब्ध नसून एकाच विषयाचं गॉसिप किती दिवस करणार?” असा प्रश्न उपस्थित केला.

मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार ?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…

पुढे बोलताना सुप्रिया यांनी अजित पवार यांचा अनुभव माझ्यापेक्षा अधिक असल्याचं सांगितलं. “एक तर तो माझा मोठा भाऊ आहे. तो माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे. अनुभव, प्रशासनातील काम त्याचं माझ्यापेक्षा जास्त आहे,” असं सुप्रिया म्हणाल्या. पुढे बोलताना सुप्रिया यांनी उदाहरण देत, मी कधी त्याच्या कार्यालयात गेल्यावर तो मला, “रेल्वेचं काम पूर्ण नाही झालं कधी करणार आहेत फोन लाव त्या मंत्र्याला आणि पूर्ण करुन घे काम”, असं सांगतो. तर आम्ही एक टीम म्हणून काम करतो, असं सुप्रिया यांनी स्पष्ट केलं. तसेच इतर राजकीय कुटुंबांमध्ये काही झालं तर आमच्याकडे झालं पाहिजे असं आहे का ?, असा उलट प्रश्न सुप्रिया यांनी भावा बहिणीमध्ये वाद असल्याची चर्चा करणाऱ्यांना विचारला. पण माझ्यात आणि दादामध्ये कोणतेही मतभेद नाही.

आणखी एक चीनी धोका : मनुष्यात आढळला H10 N3 बर्ड फ्लूचा संसर्ग, संपूर्ण जगातील पहिले प्रकरण

आता आम्हाला या वयात समज नसेल तर शेम ऑन अस, असं म्हणत सुप्रिया यांनी आपलं मत मांडलं. तसेच पुढे बोलताना, पवार कुटुंबाची मत्तेदारी होऊ शकतं नाही. ते चुकीचं ठरेल असं सुप्रिया म्हणाल्या. विचारांची नाळ ही यशवंतराव चव्हाणांपासून आहे. आजही मानसपुत्र म्हणून पवारसाहेबांना ओळखलं जातं. आमच्या पक्षात चांगलं टॅलेंट पूल आहे, असं सुप्रिया यांनी सांगितलं.

दादा आणि मी, आम्हाला अमुक पद पाहिजे इतक्या कोत्या मनोवृत्तीने आम्ही कधीच विचार करत नाही, असंही सुप्रिया म्हणाल्या. पुढे बोलताना सुप्रिया यांनी ५५ वर्षांपासून अनेक कार्यकर्ते, कुटुंबांनी शरद पवारांसोबत संघर्ष केला आहे. त्यामुळे या पक्षातील भागिदार ही आमची जबाबदारी आमची नाहीय का ? एका संघटनेत काम करतो तेव्हा केवळ मी, मला, माझं असा विचार करता येऊ शकत नाही, असंही सांगितलं.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

 

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती