राष्ट्रवादी काँग्रेसकडे शिवेंद्रराजेंविरोधात आहेत ‘हे’ ३ पर्याय !

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच शरद पवार यांनी या जागेसाठी नवीन उमेदवार शोधण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत या जागेवर शरद पवार यांनी स्वतः लक्ष घातल्याने या जागेवर चुरशीची लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांच्या या बैठकीनंतर या जागेवरून कोणताही उमेदवार उभा राहिला तरी विजय आपलाच असल्याचा विश्वास देखील शिवेंद्रराजेनी बोलून दाखवल्याने आता या लढतीत मजा येणार आहे.

या जागेविषयी बोलताना शरद पवार म्हणाले कि, माझ्याकडे या जागेसाठी सध्या तीन अर्ज असून या जागेवर आम्हाला उमेदवार शोधण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे आता शरद पवार कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अंतर्गत माहितीनुसार सध्या राष्ट्रवादी काँग्रेस उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांना देखील या जागेवरून उमेदवारी देण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणून अमित कदम यांच्या देखील नावाचा विचार केला जाऊ शकतो. या दोन्हींमध्ये एकमत झाले नाही तर तिसरा पर्याय म्हणून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या देखील नावाचा विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या मतदारसंघातील विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हि जागा शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस राखणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता.

आरोग्यविषयक वृत्त –