जिल्ह्यात ‘किंगमेकर’ ठरलेल्या राहुल कुल यांची राष्ट्रवादीला धास्ती ! रोखण्यासाठी मोठी ‘व्यूहरचना’
दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – सध्या पुणे जिल्ह्याचे राजकारण हे दौंडभोवती फिरायला लागले असून दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची जिल्ह्यामध्ये बनलेली ‛किंगमेकरची’ भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे कुल यांना दौंडमध्येच जखडून ठेवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून सुरू झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे विश्वासू आमदार म्हणून राहुल कुल यांना ओळखले जाते त्यांना अगदी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत म्हणूनही संबोधले गेले आहे आणि याची चुणूक कुल यांनी नुकतीच दाखवली आहे. राहुल कुल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असून पुणे जिल्ह्यातील राजकारणामध्ये राहुल कुल यांची ‛किंगमेकर’ ची भूमिका राष्ट्रवादीच्या दृष्टीने चांगलीच डोकेदुखी बनत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात राहुल कुल यांना रोखण्यासाठी मोठी व्यूहरचना आखण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून कुल यांनी ज्या ठिकाणी महाजनादेश यात्रा घेतली होती तेथे खुद्द शरद पवारांची सभा घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केले आहेत.
राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय लक्ष घालून राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे हीच परिस्थिती दौंड तालुक्यामध्ये पाहायला मिळत असून आनंद थोरात, राजभाऊ तांबे, महेश भागवत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले आहे. नुकत्याच काही मोठ्या पदाधिकाऱ्यांचा झालेला भाजप प्रवेश हा राहुल कुल यांच्या माध्यमातूनच झाला असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे राहुल कुल यांना तालुक्यातच रोखण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मोर्चा दौंड तालुक्यामध्ये वळवला आहे. काहीही करून कुल यांना तालुक्यातच जखडून ठेवण्यासाठी आता दिग्गज मंडळी सरसावल्याने दौंड तालुक्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर