डॉ. अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीची ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून नेते मोठ्या प्रमाणावर राज्यात दौरे करत असून माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमोल कोल्हे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठी जबाबदारी देण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात. त्याचबरोबर ते खासदार झाल्याने आपल्या मतदारसंघात फार कमी येतात अशी तक्रार देखील कार्यकर्त्यांनी केल्यानंतर त्यांनी याविषयी उत्तर देताना हे भाष्य केले आहे. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले कि, ‘अमोल कोल्हे हे निवडणुकीनंतर भोसरी इथं येत नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी यापुढे चालणार नाहीत कारण आता त्यांना राज्यात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे.

कार्यकर्त्यांना कानपिचक्या

निवडणूक झाल्यानंतर कोल्हे हे भोसरीमध्ये येत नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्यानंतर अजित पवारांनी त्यांना कानपिचक्या देत म्हटले कि, ते आता खासदार झाले आहेत त्यामुळे ते दिल्लीत तुमचे प्रश्न मांडणार कि, चौकात येऊन गप्पा मारणार. त्याचबरोबर ते दिल्लीत अतिशय चांगले काम करत असल्याची शाबासकी देखील त्यांनी अमोल कोल्हे यांना दिली. त्याचबरोबर अमोल कोल्हे यांना येत्या काळात राज्याचा दौरा करायचा असून शरद पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राज्य पिंजून काढायचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –