NCP Umesh Patil On Rajan Patil | ‘राजन पाटील यांच्यामुळे मला पाटील म्हणवून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते’ – उमेश पाटील

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Umesh Patil On Rajan Patil | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी सोलापुरात एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर सडेतोड टीका केली. या अशा लोकांमुळे मला पाटील म्हणवून घ्यायची लाज वाटते, असे उमेश पाटील (Umesh Patil) म्हणाले. (NCP Umesh Patil On Rajan Patil)

 

राजन पाटील म्हणतात, आमच्या मुलांना लग्नाच्या अगोदर मुले झालेली आहेत. तसेच आम्हाला त्याचा अभिमान असल्याचे देखील राजन पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आमच्या मुलांना लग्णाच्या अगोदर मुले झाले असे सांगणारा विकृत आणि असंस्कृत माणूस आम्हाला भीमा सहकारी साखर कारखान्याचा नेता म्हणून चालणार नाही. हा एकप्रकारे महिलांचा सुद्धा अपमान आहे. त्यामुळे भोर तालुक्याच्या जनतेच्या संवेदनशीलतेची मला कीव येत आहे. असला नेता भोर तालुक्याने तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिला. त्यामुळे मला पाटील म्हणवून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते, असे उमेश पाटील यावेळी म्हणाले. (NCP Umesh Patil On Rajan Patil)

मुलांच्या नावाने वडीलच बिले फाडत आहेत. अशी स्थिती सध्या राजन पाटील यांच्या घरात आहे. त्यामुळे असा असंस्कृत आणि विकृत मनोवृत्तीच्या माणसाला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जागा दाखवण्यासाठी मी मतदारांना आवाहन करत आहे, असे पाटील म्हणाले.
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजन पाटील (Rajan Patil)
आणि भाजपचे आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak)
‘भीमा बचाव परिवर्तन पॅनल’ विरोधात भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik)
यांच्या ‘भीमा शेतकरी विकास आघाडी’ चा प्रचार करत आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील बोलत होते.
त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

 

Web Title :- NCP Umesh Patil On Rajan Patil | ‘Because of Rajan Patil,
I am ashamed to even call myself Patil’ – Umesh Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा