NCP Vs BJP Maharashtra | ‘शरद पवार पावसात भिजले आणि भाजपला न्युमोनिया’; राष्ट्रवादीचंं भाजपला प्रत्युत्तर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Vs BJP Maharashtra | 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भर पावसात घेतलेली सभा सर्वांना माहित आहे. मात्र या सभेवरून आता राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहेत. या सभेचा धागा पकडत भाजप (BJP) नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी पवारांवर निशाणा साधला होता. पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (NCP Vs BJP Maharashtra)

 

साताऱ्याच्या (Satara) पावसामध्ये भिजूनही तुम्हाला 54 च्या वर जाता आलं नाही. आता ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार घाबरू नका, काळजी करू नका, असं सांगावं लागत असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले होते. यावर, गोपीचंद पडळकर उठसूठ शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य करत असतात. भाजपला महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता काबीज करता आली नाही, हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो. शरद पवार पावसात भिजले आणि न्युमोनिया (Pneumonia) मात्र भाजपला झाला, असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे. (NCP Vs BJP Maharashtra)

 

शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय पडळकरांना प्रसिद्धी मिळत नाही, हे त्यांनाही कळून चुकलं आहे.
ते रोज पवारांवर आणि राष्ट्रवादीवर टीका करत असतात.
वारंवार शरद पवार यांचे नाव घेऊन प्रसिद्धी मिळवण्याची त्यांची धडपड सुरू आहे, असं तपासे म्हणाले.

 

दरम्यान, महेश तपासे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पडळकर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- NCP Vs BJP Maharashtra | NCP chief sharad pawar got wet in satara rain in 2019 elections but pneumonia hit bjp slammed ncp mahesh tapase gopichand padalkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

 

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा

 

Pune Crime | धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ आणि आजोबा, चुलत मामाने केले लैंगिक अत्याचार; समुपदेशक महिला ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना पिडीतीने सांगितली ‘आपबिती’