आमदार भारत भालकेंचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरपूरमधील काँग्रेसचे विद्यामान आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. परंतु ते आता राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचे समजत आहे. भारत भालके यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. भारत भालके यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पीए एस. सागर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला आहे.

NCP will contest MLA Bharat Bhalke's resignation | आमदार भारत भालके यांचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून लढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत भालके यांना मुंबईला बोलावून घेतले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलले जात होते. परंतु अचानक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भालकेंनी कालच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. ते राष्ट्रवादीकडून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पंढरपूर विधानसभेची जागा भाजपचा मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेला सोडण्याचा निर्णय झाल्याचे समजत आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे रयत क्रांती संघटनेचे उमेदवार असतील. रयतचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सोमवारी सायंकाळी परिचारक यांच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे.

Visit : policenama.com