राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदासाठी नवा चेहरा देऊ : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन
वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदी पुन्हा नाव लागण्याची शक्यता आहे. पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच नवा चेहरा दिसेल असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील हल्ला बोल बैठकी वेळी मांडली. या वक्तव्यामुळे लवकरच शहर अध्यक्षपदी नवा चेहरा दिसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिकेच्या निवडणुकीनंतर शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. याच महिन्यात वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याने पुन्हा शहर अध्यक्षपदाच्या चर्चेला उधाण आले होते. त्या बाबत प्रदेश पातळीवर हालचालीना वेग आल्याचे दिसते. या सर्व घडामोडी घडत असताना

आज पुण्यात पश्चिम महाराष्ट्राच्या हल्ला बोल मोर्चा निमित्त आयोजित बैठकीवेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यपध्द्तीवर निशाणा साधला.