राष्ट्रवादी घेणार साडेचार वाजता निर्णय

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही सत्तास्थापनेचा तिढा सुटताना दिसून येत नाहीये. काल राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते. मात्र भाजपने आपण सत्तास्थापन करणारा नसल्याचे राज्यपालांना कळवल्यानंतर आता शिवसेनेला आमंत्रित करण्यात आले आहे.त्यानंतर आता दोन्ही पक्ष शिवसेनेला पाठिंबा द्यावा कि नाही यावर चर्चा करत आहेत.

काँग्रेसची चार वाजता दिल्लीमध्ये शेवटची बैठक पार पडणार असून राष्ट्रवादी काँग्रेस देखील साडेचार वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, काँग्रेसचा निर्णय हा चार वाजता होणार असून त्यांच्या निर्णयानंतर आम्ही साडेचार वाजता आमचा निर्णय सांगणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पर्यायी सरकार देणे हि आमची जबाबदार असून आम्ही सरकारमध्ये सामील होणार असल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेनेच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले कि, अनेक अनेक दिवसांपासून शिवसेना संपर्कात असून त्यांच्याशी आमची चर्चा सुरु असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेस आज चार वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार असून राज्यामध्ये शिवसेना देखील यामुळे वेटिंगवर असून त्यांचे लक्ष आघाडीच्या भूमिकेकडे लागले आहे.

Visit : Policenama.com