काँग्रेसला सोबत घेऊनच राष्ट्रवादी सत्तास्थापनेचा निर्णय घेणार : नवाब मलिक

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या निवडणूक आलेल्या 54 आमदारांची बैठक पार पडली या बैठकीत आमदारांकडून प्रस्ताव मांडण्यात आला की सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शरद पवारांना अधिकार देण्यात यावेत. परंतू शरद पवारांनी सांगितले की एक समिती गठीत करण्यात येईल. त्या समितीशी शरद पवार चर्चा करतील आणि निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवाब मलिक म्हणाले की काँग्रेसच्या नेत्यांची पवारांशी चर्चा होईल. काँग्रेस नेते अहमद पटेल, वेणूगोपाल आणि मल्लिकार्जून खर्गे मुंबईत येतील त्यांच्याची शरद पवार चर्चा करतील. ते पुढे म्हणाले की काँग्रेसला सोबत घेऊनच सत्तास्थापनेसंबंधित निर्णय घेण्यात येईल. आमच्याकडे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नाही. तिन्ही पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार स्थापन होऊ शकत नाही.

राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केल्याची चर्चा असल्याचे पत्रकारांनी नवाब मलिक यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की आम्ही राजपाल्यांच्या प्रवक्यांशी चर्चा केली, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसंबंधित कोणतीही शिफारस केली नाही किंवा निर्णय घेतलेला नाही.

Visit : Policenama.com