राष्ट्रवादी खडसेंचा उपयोग फडणवीसांविरूध्द करणार, भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याच मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath-khadse) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीची कास धरली असताना केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसहेब दानवे (raosaheb-danve) यांनी मोठ विधान केले आहे. राष्ट्रवादी आता एकनाथ खडसे यांचा उपयोग भाजप आणि देवेंद्र फडणवीसांविरुद्ध (devendra-fadnavis) करणार असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केले आहे. खडसे हे लढाऊ नेते आहेत. त्यांचे भाजप वाढविण्यात मोठं योगदान होत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपची हानी होईल असं मतही दानवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे. खडसे हे गेल्या काही वर्षांपासून पक्षात नाराज होते. त्याची जाहीर वाच्यताही त्यांनी केली होती. ते जाऊ नयेत यासाठी खूप प्रयत्न केले गेले. मात्र त्याच मत त्यांनी तयार केलच होत, असही दानवे म्हणाले.
एवढा मोठा नेता जर पक्षात आला तर त्याचा उपयोग हा त्या पक्षाला होतच असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता राजकारणात त्याचा फायदा करून घेतील असंही दानवे म्हणाले. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मंत्रिपदाबाबत. खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खडसे यांचं पुनर्वसन कस करायचे ते शरद पवार ठरवतील. ज्यावेळेस प्रवेश करण्याचे ठरविले जाते त्यावेळेस हे निर्णय होत असतात. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

त्यावर शरद पवारच बोलू शकतीलhy

दरम्यान खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा आहे असा प्रश्न भुजबळांना विचारला असता, त्यावर बोलताना ते म्हणाले, यावर शरद पवारच बोलू शकतील. मला त्यातलं काही माहित नाही. राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांचे स्वागत आहे. आता सर्व ठरलं आहे, त्यामुळे चर्चेचं कारणच नाही असेही त्यांनी सांगितल.