Budget 2019 : सरकारचा ‘अर्थसंकल्प’ गोंधळलेलाच, जयंत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या कार्यकालातील दुसऱ्या टर्ममधील अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाकडून अनेकांच्या आशा- अपेक्षा होत्या. अनेकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या तर अनेकांच्या अपेक्षांचा भंग झाल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. सामन्य लोकांसह अनेक नेत्यांनीही यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपले मत व्यक्त कले आहे. सीतारामन या महागाईबद्दल महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही, असं जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.

अर्थसंकल्पावर जयंत पाटलांनी टीका करत हा अर्थसंकल्प गोंधळलेला आहे. सरकारला नक्की कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यायचं आहे. याची स्पष्टता या अर्थसंकल्पात दिसत नाही. तसंच हा अर्थसंकल्प शिवाय युवा वर्गाला नाराज करणारा आहे, असा घणाघात जयंत पाटलांनी यावेळी केला. तसंच या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही योजना आणि निधी घोषित होईल असं अपेक्षित होते. मात्र तसं काही झाले नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शेतीनंतर त्यांनी देशातील कंपन्यांवरही आपले मत व्यक्त केले आहे. देशातील मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत. त्यावर अर्थसंकल्पात कोणताच उपाय केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पात देशाच्या विकासाला गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसणार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार