राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून 17 बंडखोर सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – काल उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पडली. यात आमदार राणा जगजितसिंह पाटील समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने अध्यक्ष व उपाध्यक्ष पद निवडीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा व्हीप झुगारून मतदान केले. आता व्हीपचा अधिकार कुणाचा यावरून वाद सुरू झाला आहे. पाहुया याबाबत एक खास रिपोर्ट

गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पक्षाने दिलेला व्हीप डावलत आमदार राणा पाटील यांच्या समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 17 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अस्मिता कांबळे यांना अध्यक्ष पदासाठी तर उपाध्यक्ष पदाकरिता शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना मतदान केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी यासंदर्भात ही कारवाई करत त्यांच्याविरुद्ध
अपात्रतेची कारवाई करत असल्याचे सांगितले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करून भाजपकडून आमदार झालेल्या राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्यासह विद्यमान अध्यक्ष अस्मिता कांबळे यांचाही समावेश असल्याने राजकीय अस्थिरतेची चर्चा रंगली होती. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या १७ सदस्यांनी व्हिप न पाळल्याने त्यांच्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा प्रस्ताव दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे कालच विषय समितीच्या निवडी पार पडल्या यातही या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगत. भाजपा आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला साथ दिली. यावेळी बोलताना नूतन सभापती दत्तात्रय देवळकर यांनी आम्ही स्वतंत्र गट स्थापन केलेला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना आम्हाला व्हिप देण्याचा कसलाही अधिकार नसल्याचे सांगितले.

आता राष्ट्रवादी काँग्रेस व राणाजगजितसिंह जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला शह देत सत्तास्थान आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले असले तरी आता राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांच्या आपात्रतेसाठी खरच प्रयत्न करणार का? नेमकं कोणाचा व्हिप खरा ठरतो यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like