बलात्काराच्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिघा परिसरात राहणाऱ्या एका शिक्षिकेने राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक रामआशिष यादव याच्या विरुद्ध शनिवारी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती. पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल करून यादव याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यादव याने पीडित महिलेचे अश्लील फोटो काढले होते. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मागील काही महिन्यांपासून यादव या महिलेचे लैंगिक शोषण करत होता. त्यामुळे या महिलेने रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली.

पीडित महिलेने तक्रार करताच यादव याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी रात्री त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यादव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी नगरसेवक असून त्याची या परिसरात दहशत आहे.

You might also like