माजी खासदारास जमीन फसवणूक प्रकरणात अटक

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. परभणीतील नानलपेठ पोलिसांनी ही कारवाई केली. ज्ञानोपासक महाविद्यालय कर्मचारी गृहनिर्माण सोसायटीच्या जमीन फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0a9ff77-d040-11e8-a160-7beac9cc1c36′]

दुधगावकर यांना त्यांच्या परभणी तालुक्यातील पोखरणी येथील घरातून सकाळी ६ वाजता पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना परभणीत नानलपेठ ठाण्यात आणण्यात आले. येथे वैद्यकीय तपासणी नंतर सकाळी पावणेदहा वाजता त्यांना अटक करण्यात आली.

ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायटीच्या १०० कोटी रुपयांच्या जमीन फसवणूक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन तलाठी दत्तात्रय कदम याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एकूण ५ जणांविरुद्ध ४२० कलमांतर्गत सहा महिन्यापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता.

[amazon_link asins=’B01M0IW0F7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bc84471e-d040-11e8-965d-c3a8c0e83f44′]

परभणी शहरालगत असलेल्या सर्व्हे नं. ६१३ मधील १६ एकर ८ गुंठे जमीन ही शहरातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी खरेदी केली होती. धनादेशाद्वारे शेतमालकाला पैसे देण्यात आले होते़ ज्ञानोपासक महाविद्यालयाचे कर्मचारी तथा या गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक बुलंगे यांच्या हातावर हा व्यवहार झाला होता. परंतु त्यानंतर कालांतराने बुलंगे यांचे संमत्तीपत्रक घेण्यात येऊन ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री अ‍ॅड. गणेशराव दुधगावकर यांच्या नावे या जमीनीचा फेरफार झाला. हा फेरफार तात्कालीन तलाठी दत्ता श्रीरंग कदम आणि मंडळाधिकारी पवार यांनी केला होता. ज्ञानोपासक महाविद्यालयाचे तात्कालीन प्राचार्य व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. बाबुराव सोळंके यांनी या प्रकरणात लेखी तक्रार देऊन पोलिसात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.

रिलायन्सच्या वीजग्राहकांना बसणार २ हजार कोटींचा भुर्दंड

पोलिसांनी प्रारंभी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर डॉ. सोळंके यांनी न्यायालयात जाऊन पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याबाबत याचिका दाखल केली. न्यायालयाने या फेरफार प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. त्यानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला. परंतु अटक मात्र कोणालाही केली नाही. आता सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त तलाठी दत्ता कदम यांना व त्यानंतर आज दुधगावकर यांना अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B01IY9IXJI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c6a5e3b-d042-11e8-9510-99ff8b0c30e8′]