home page top 1

राष्ट्रवादीचा ‘तो’ नगरसेवक पोलिस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- अपहरण करून मारहाणीत गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्र्यंबके यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यास आज दुपारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते.

त्र्यंबके याने पोलीस कर्मचाऱ्याची त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. स्वतःच्या संपर्क कार्यालयात नेऊन बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात नगरसेवक सुनील त्र्यंबके व इतरांविरुद्ध अपहरण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात फरार असलेला नगरसेवक त्र्यंबके हा त्याच्या राहत्या घरी आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्यावरून सोमवारी पोलिसांनी त्रिंबके याला अटक केली होती तोफखाना पोलिसांनी आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

स्थायी समिती सभापतीला ‘एमसीआर’
सर्जेपुरा परिसरात गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीप्रकरणी अटक केलेल्या महापालिका स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख वसीम शेख या दोघांना आज दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन
“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय
” टाच ” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

Loading...
You might also like