राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाअध्यक्ष तथा माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर भाजपच्या वाटेवर ?

नेमकं बापूसाहेब गोरठेकर कोणत्या पक्षाचे असे चर्चेला उत

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रावादी अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे अतिशय विश्वासू असलेले कार्यकर्ते बापूसाहेब गोरठेकर हे भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा नांदेडच्या राजकरणात रंगताना दिसत आहे. भाजपचे नवनिर्वाचित खासदार प्रताप चिखलीकर यांना खासदार झाल्याबद्दल अभिनंदन देणाऱ्या पोस्टरवर बापूसाहेब गोरठेकर यांचे फोटो झळकले होते. त्यानंतर नांदेडच्या राजकारणात राष्ट्रावादीचे इमानदार बापूसाहेब गोरठेकर राष्ट्रवादी सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

बापूसाहेब गोरठेकर यांचे वडिल स्व. बाबासाहेब गोरठेकर राष्ट्रवादीशी एकनिष्ठ होते. ते राष्ट्रवादीकडून अनेकदा आमदार झाले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत बापूसाहेब यांनीही राष्ट्रावादीचा वसा घेतला. भोकरदान विधानसभा लढता लढता नायगाव विधानसभा निवडणूक लढवली त्या ठिकाणी मात्र त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला.

BJP

तसंच भोकरमध्ये जुन्या ग्रामपंचायतीत केवळ गोरठेकर पॅनलचा झेंडा फडकताना दिसायचा तेव्हा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी या मतदार संघात एन्ट्री घेतली. त्यानंतर गोरठेकर यांच्यासह राष्ट्रवादी पार्टीतील सर्वच कार्यकर्त्यांनी काँग्रेस (आय) मध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोरठेकर यांच्या कुटुंबावर असलेले तेथील लोकांचे प्रेम कमी झाल्याची चर्चा होत होती. पण गोरठेकर हे राष्ट्रवादीचेच नेते म्हणून कार्यरत राहिले. मात्र आता अचानक गोरठेकर यांचे फोटो भाजप खासदारांच्या पोस्टरवर दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात गोरठेकरांविषयी शंका आहेत.

दरम्यान, उमरी येथे खासदार प्रताप चिखलीकर आणि भाजप आमदार राम रातोळीकर यांचे उमरी नगरीत हार्दिक स्वागत असे पोस्टर लावले होते. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. तसंच गोरठेकर अनेकदा भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना भाजपने विधानसभेचे तिकीट दिल्यावर ते भाजपमध्ये जातील अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र गोरठेकर यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नसल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सिनेजगत बातम्या

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

 

Loading...
You might also like