… तर जगातील कोणतीही ‘ताकद’ हरवू शकत नाही, शरद पवारांनी दिला होता आ. रोहित यांना सल्ला

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा – 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या तरुण आमदारांसह सुसंवाद साधण्यात आला. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांचा समावेश होता. तर मुलाखतकार अभिनेते अवधूत गुप्ते होते.

मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी रोहित पवार यांना विधानसभेच्या निवडणूकीत तुम्ही कर्जत – जामखेड हा मतदारसंघ का निवडला असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की कर्जत जामखेडमध्ये तीस वर्षांपासून विकास नव्हता, त्यामुळे मतदारसंघात विकास करण्याची संधी होती. मी विकासाचे मॉडेल तयार करण्याचे ठरवले होते. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कर्जत-जामखेड मधील जनता माझ्या पाठिशी असल्यामुळे माझा विजय झाला.

तुम्ही ज्या वेळी निवडून आलात तेव्हा तुमच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असल्याचा भावनिक प्रश्न रोहित यांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की मी जिंकलो म्हणून माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले नव्हते. तर लोकांनी मला मोठ्या प्रेमाने, मताधिक्याने निवडून दिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

रोहित पवार म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला कधीही हार मानायची नाही. कितीही मोठे आव्हान समोर असले तरी झुकायचे नाही हे शिकवले. त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू ठेवून काम करा, लोकांशी खोटं बोलू नका. लोकांचे प्रामाणिकपणे काम केले तर जगातील कोणतीच ताकद हरवू शकत नाही असा सल्ला शरद पवार यांनी दिला होता.

कर्जम जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि भाजप नेते राम शिंदे यांच्या कडा मुकाबला झाला होता. यात रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या पराभव केला. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस निवडणूकीच्या आखाड्यात उतरले होते. तुम्ही राम शिंदेना निवडून दिलं तर त्यांना आणखी चांगलं कॅबिनेट पद देऊ तसेच कर्जत जामखेडमध्ये बाहेरुन आलेले पार्सल परत पाठवा असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु कडवी झुंज देत रोहित पवार यांनी विजय खेचून आणला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like