शरद पवार – सोनिया गांधींची भेट रद्द ! राष्ट्रवादीची उद्या महत्वाची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची उद्या पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित असणार आहेत.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत मोठा निर्मण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या पेचाच्या पार्श्वभूमीवर उद्या (रविवार 17 नोव्हेंबर) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शरद पवारांची दिल्लीत भेट ठरली होती. पंरतु काही कारणाने ही भेट रद्द झाली. यानंतर आता राष्ट्रवादीच्या गोटात वेगानं हालचाली सुरू आहेत.

सध्या राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेक बैठकाही झाल्या आहेत. परंतु अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. अशात सोनिया गांधी आणि पवारांमधील भेटही रद्द झाली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा पेच वाढतो की काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. याशिवाय उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like