आमदार मुरकुटे यांच्या अडचणीत भर ? राष्ट्रवादीचा क्रांतिकारी शेतकरी पक्षाला पाठिंबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नेवासा विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात उमेदवार उभा न करता शेतकरी क्रांतिकारी पक्षाला आज पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

नेवासा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी कुणाला उमेदवारी देणार, याकडे गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता ताणली गेली होती. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीने शेतकरी कामगार क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार माजी आ. शंकर गडाख यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. राष्ट्रवादीने गडाख यांना पाठिंबा दिल्याने मुरकुटे गट अस्वस्थ झाला आहे.

मागच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत गडाख यांनी नेवासा मतदारसंघातून जोरदार तयारी केली आहे. भाजपकजून आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची उमेदवारी कापली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादीने त्यांचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेत गडाख यांना पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

visit : Policenama.com