गुजरात लोकसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादीचा ‘यु टर्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने घेतला होता. गुजरातच्या सर्वच्या सर्व २६ जागा लढवण्याच्या या निर्णयावरून आता राष्ट्रवादीने यु टर्न घेत फक्त एक जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गजरातमधून राष्ट्रवादीची ही सफसेल माघार असल्याचे बोलले जात आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर राष्ट्रवादी गुजरातमध्ये लोकसभा निवडणूकीत जोरदार मुसंडी मारेल असे वाटत होते. त्याप्रमाणे त्यांनी सर्वच्या सर्व जागा लढवण्याचे संकेतही दिले होते. वाघेला अमित शहा यांच्या विरोधात गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात असतील अशी चर्चा होती. मात्र, या निर्णयातून माघात घेत राष्ट्रवादीकडून केवळ एकच उमेदवार घोषीत करण्यात आला आहे.

आता राष्ट्रवादी गुजरातमधून पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून विरेंद्र पटेल यांना उतरवणार आहे. त्यामुळे विरेंद्र पटेल हे एकमेव उमेदवार राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात असणार आहेत. दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला २९ जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे राष्टृवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर वाघेला हे गांधीनगरमधून लढणार अशी चर्चा होते.