कोल्हापूरात राष्ट्रवादीकडून ‘डुप्लिकेट’ मुख्यमंत्र्यांचा सन्मान करुन अनोखे आंदोलन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शिल्पा माजगावकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘आउट स्टँडिंग लीडर शिप इन डेव्हलपमेंट’ हा पुरस्कार मिळाल्या बद्दल कोल्हापुरात आज (गुरुवार) राष्ट्रवादी  काँग्रेसच्या वतीने  लक्षवेधी आंदोलन छेडण्यात आले. घोषणांचा पाऊस पाडत लोकांची फसवणूक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा डुप्लिकेट उभा करून त्याना हा पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डुप्लिकेटने हुबेहूब मुख्यमंत्र्यांची केलेली नक्कल करुन सर्वाचं लक्ष वेधून घेत होती.

Advt.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत स्टॅंडिंग लीडरशिप डेव्हलपमेंट हा पुरस्कार नुकताच मिळाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अमेरिकेत गौरव होत असेल तर महाराष्ट्रातही व्हायला पाहिजे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. गेल्या चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी घोषणांचा पाऊस पाडुन कोणतीच विकास कामे केले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल भाव कमी करू , शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी घोषणा करणे,  शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळवून देणे अशा अनेक घोषणा  मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. परंतु केलेली एकही घोषणा पूर्णत्वास आलेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी  कार्यालयासमोर  मुख्यमंत्र्यांचा  डुप्लिकेट उभा करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या आंदोलनात मुख्यमंत्र्यांच्या डुप्लिकेटने केलेलं भाषण हे  विनोदी असल्याने एकच हशा पिकाली. या आंदोलनाची चर्चा आज दिवसभर कोल्हापुरात होती.