NRC वरून केजरीवाल आणि मनोज तिवारी यांच्यात जुंपली ! दिल्‍लीचे CM म्हणाले – तिवारींना दिल्‍ली सोडावी लागेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय नागरिक रजिस्टर म्हणजेच एनआरसी वरून आता दिल्लीत देखील राजकारण सुरु झाले आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या या विधानानंतर त्यांच्यात आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यात ट्विटर युद्ध रंगले आहे.

आसाममध्ये सरकारने एनआरसी लागू केल्यानंतर आता त्यावरून देशभरात मोठे राजकारण सुरु झाले आहे. मनोज तिवारी यांनी सरकारच्या या योजनेचे कौतुक करून संपूर्ण देशभरात हि योजना लागू करण्याची विनंती केली होती. तसेच दिल्लीत देखील हि योजना लागू करावी असे म्हटले होते. दिल्लीत परिस्थिती बिघडत चालली असून इथे देखील याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी तिवारी यांना टोला मारताना म्हटले कि, जर हि योजना दिल्लीत लागू झाली तर सर्वात आधी तिवारी यांना दिल्ली सोडावी लागेल. त्यामुळे आता यावरून केजरीवाल आणि मनोज तिवारी यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता मनोज तिवारी यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.