आयकर विभागाच्या हाती लागले तब्बत 3000 कोटींचे घबाड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एनसईआरच्या एका रिअल इस्टेट ग्रुपवर आयर विभागाने टाकलेल्या धाडीत मोठे घबाड हाती लागले आहे. सोमवारी यसीबीडीटीला याची माहिती देण्यात आली आहे. सीबीडीटीने याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.


मागील आठवड्यात एका ग्रुपच्या 25 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. हा ग्रुप इन्फ्रस्ट्रक्चर, मायनिंग आणि रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय कते. तर सुत्रांनुसार ओरिएंटल इंडिया ग्रुपवरही धाड टाकण्यात आल्याचे समजतेय. कॅश लेजरमध्ये जवळपास 250 कोटींचा काळा पैसा हाती लागला आहे. हे पैसे जप्त करण्यात आले आहेत.

या ग्रुपने अनेक मालमत्ता विक्री, खरेदीमध्ये कर भरलेला नाही. तसेच जवळपास 3.75 कोटी रुपयांची बेकायदा संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय चौकशीत 3 हजार कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. तसेच या रकमेवर करही भरण्याचे कबूल केले. या छाप्यानंतर ग्रुपचे 32 लॉकर सील करण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com