तुमची मुलं ऑनलाइन ‘गेमिंग’च्या नावाखाली ‘गॅम्बलिंग’च्या मायाजालात नाहीत ना अडकत ? ‘या’ प्रकारे राहा सतर्क, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुले – किशोरवयीनांमध्ये ऑनलाइन गेमिंगची जबरदस्त क्रेझ असते, परंतु गेम्समध्ये पैसे जिंकण्याची बाब सहभागी झाली, तर गेम हा गॅम्बलिंग म्हणजे जुगारात बदलतो आणि अशा प्रकारच्या गॅम्बलिंगचा सध्या पूर आला आहे. ऑनलाइन गेमिंग आणि पैसे कमावण्याच्या लोभाच्या आड जुगाराला प्रोत्साहन मिळाल्याने मुलांचे जीवन बरबाद होऊ शकते. या जाळ्यात मुले कशी फसतात ते जाणून घेवूयात…

सध्या तुम्ही ठरवले तरी मुलांना ऑनलाइन गेमपासून दूर ठेवू शकत नाही. कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान मुलांचा कल या गेम्सकडे जास्त वाढला आहे, परंतु आता धोका केवळ ऑनलाइन गेमिंगपर्यंत मर्यादित नाही, तर याच्या आडून गॅम्बलिंग म्हणजे जुगाराचा खेळ सुद्धा खेळला जात आहे, जो मुलांचे जीवन बरबाद करू शकतो. यासाठी ल्यूडो, कँडी क्रश, तीनपत्ती, पोकर इत्यादी गेम्सची मदत घेतली जात आहे.

तुम्ही सर्वांनी टीव्हीवर सुद्धा याचा प्रचार करणार्‍या जाहिराती पाहिल्या असतील. अशा प्रकारच्या गेम्सला प्रोत्साहित केल्याने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अ‍ॅक्ट्रेस तमन्ना भाटियाच्या विरूद्ध मागील काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये ऑनलाइन जुगार (गॅम्बलिंग) बॅन करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे, गॅम्बलिंगच्या श्रेणीत येणार्‍या ऑनलाइन गॅम्बलिंग गेम्सची तुलना ब्लू व्हेल गेमशी केली जात आहे, ज्यामुळे अनेक किशोर आणि तरूणांचा जीव गेला होता.

गेमला बदलू नका गॅम्बलिंगमध्ये
ऑनलाइन गेमिंगची क्रेझ कवेळ मुले आणि किशोरांमध्येच नाही, तर मोठे सुद्धा यामध्ये दिसतात. प्रत्येक वर्गाच्या हिशेबाने गेमिंग अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेयर्ससुद्धा आहेत. परंतु, देश-विदेशातील काही कंपन्या आता ऑनलाइन गेमिंगच्या आडून युवकांना गॅम्बलिंगच्या जाळ्यात फसवू लागल्या आहेत.

किशोरवयीन आणि तरूण यामध्ये सहज फसत आहेत. कारण त्यांना गेमचे पैसे जिंकण्याची संधी मिळते. गेमिंगच्या दरम्यान जिंकल्यावर गिफ्ट, रोख रक्कमेसह दुसर्‍या प्रकारच्या ऑफर्स सुद्धा दिल्या जातात. या गेम्सच्या वेडापायी तरूण आपला मौल्यवान वेळ, पैसा बरबाद करत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी चेन्नईत एका तरूणाने ऑनलाइन जुगारासाठी उधार घेतलेले पैसे न चुकवल्याने आत्महत्या केली. अशाप्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत.

बहुतांश गेम्समध्ये व्यूईग रूम एक्सप्रीयन्ससोबत ऑनलाइन प्लेयर्ससोबत खेळण्याची सुविधा असते, ज्यामध्ये लिंकला फ्रेंड्स इत्यादींना शेयर करून गेमच्या निकालावर जुगार लावला जातो. नुकतेच मद्रास हाईकोर्टच्या मदुरै बेंचने ऑनलाइन गेमिंगला नियंत्रित करण्यासाठी कायद्याची गरज असल्याचे म्हटले होते. बेंचने म्हटले होते की, तरूणांमध्ये ऑनलाइन गेमिंग किंवा जुगाराचे व्यसन कुटुंबाना आर्थिक नुकसान सुद्धा पोहचवत आहे. गुगल प्ले स्टोरवर सुद्धा ऑनलाइन गॅम्बलिंगशी संबंधित अनेक अ‍ॅप्स आहेत. अशात पालकांसाठी जास्त सतर्क राहण्याची गरज आहे.

व्यसन लागू शकते
सध्या शाळा-कॉलेज बंद आहेत, आणि ऑनलाइन गोष्टींना महत्व दिले जात आहे. यामध्ये मुलांना टेक्नॉलॉजी/मोबाइलपासून वेगळे ठेवले जाऊ शकत नाही, परंतु मुले लहान आहेत, तर पालकांनी हे पाहिले पाहिजे की, ते किती वेळ मोबाईलवर गेम खेळतील किंवा मोबाइल पाहतील, ते कोणता गेम खेळत आहेत आणि कुठला नाही. आता अनेक मुलांना आऊटडोर गेम्सच्या तुलनेत ऑनलाइन गेम्स जास्त आवडतात.

येथे गेमिंगच्या दरम्यान क्षणाक्षणाला वाढणारा रोमांच आणि आकर्षक थीम, म्युझिक त्यांना बांधून ठेवते. हळुहळु मुलांना ऑनलाइन गेम्सचे व्यसन लागते, परंतु असे ऑनलाइन गेम्स, ज्यामध्ये मल्टीप्लेयर्स किंवा ऑनलाइन प्लेयर्ससोबत खेळण्याची सुविधा असते, त्याबाबत मुलांना जागरूक केले पाहिजे.

मल्टीप्लेयर गेम्समध्ये जगभरातील लोक एकावेळी कनेक्ट होऊन गेम खेळतात, परंतु यामध्ये फेक आयडेंटिटी सोबत अनेक प्लेयर उपस्थित असतात, ज्यांचे काम मुलांना जाळ्यात फसवण्याचे असते. ते मुलांना ऑनलाइन गॅम्बलिंगसाठी प्रवृत्त करतात, त्यांना ब्लॅकमेल करू शकतात, त्यांचा फोटो मागू शकतात इत्यादी.

तयार करा सेफ प्लेस
शाळा बंद असल्याने मुलांची ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीज सध्या खुप वाढली आहे, परंतु मुलांना ऑनलाइन सेफ्टी बाबत जास्त माहिती नसते, परंतु पालकांसाठी सध्याचा काळ डोळ्यात तेल घालून जागृत राहण्याचा आहे. सध्या हजारोंच्या संख्येने पॉप्युलर व्हीडियो गेम्स, गेमिंग अ‍ॅप्स इत्यादी उपलब्ध आहेत. मुले कोणत्या साईटवर जात आहेत आणि कोणत्या अ‍ॅपला व्हिजिट करत आहेत, त्याची माहिती पालकांना असली पाहिजे.

ऑनलाइन गेमिंग मुलांसाठी मज्जा करण्याचे माध्यम होऊ शकते, परंतु यामध्ये सेफ्टीशी संबंधीत बाजू सुद्धा आहेत. फिशिंग, क्रेडिट कार्ड थेफ्ट, आयडेंडिटी थेफ्ट, कम्प्यूटर वायरस, सायबर बुलिंग इत्यादीचा धोकासुद्धा नेहमी असतो. अशा स्थितीत पालकांची जबाबदारी वाढते की, मुलांना गेम खेळण्याची परवानगी देत असाल तर त्यांच्यासाठी प्रथम सेफ प्लेस सुद्धा तयार करा, जसे की, डिव्हाईसवर किड्स मोडचा वापर, पॅरेंटल टूल्स, अँटीव्हायरस टूल्स इत्यादी. सोबतच मुलांना हेदेखील सांगितले पाहिजे की, कोणत्याही प्रकारची लिंक ओपन करू नका, कारण फिशिंग आणि लिंक बेस्ड स्कॅम आजकाल खुप सामान्य झाले आहेत.

गेमिंग प्रोफाईल दरम्यान राहा सतर्क
पीआयआय म्हणजे पसर्नल आयडेंटिफिशन इन्फॉर्मेशन तो डाटा आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला ओळखले जाते. यामध्ये पूर्ण नाव, वय, ईमेल अ‍ॅड्रेस, क्रेडिट कार्ड डिटेल्स इत्यादी असू शकते. सायबर क्रिमिनल्स पीआयआय डार्क वेबवर सेल करू शकतात. किंवा याचा वापर चोरीसाठी करू शकतात. यासाठी पालकांनी मुलांना त्या गेम्सपासून दूर ठेवावे, ज्यामध्ये प्रोफाईल तयार करून खेळावे लागते.

अनेक गेम्समध्ये चॅटची सुविधा असते. ज्यामध्ये मलिशस लिंक शेयर केली जाऊ शकते, जी ओपन करणे टाळले पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा की, मुले गेमिंगच्या दरम्यान खर्‍या नावाचा वापर करणार नाहीत, आयपी अ‍ॅ़ड्रेस शेयर करणार नाहीत आणि कोणत्या अमिषाला फसून पर्सनल इन्फॉर्मेशन देणार नाहीत.

गेमवर प्रोफाइल तयार करताना रियल प्रोफाइल पिक्चर लावू नका. ऑनलाइन गेमिंगबाबत मुलांना जागरूक करा की, त्यांच्यासाठी कोणता गेम योग्य आहे, कारण अनेक गेम स्किलशी संबंधित आहेत, जे युजफुल ठरू शकतात. जर ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीज दरम्यान काही संशयास्पद वाटले तर त्याबाबत पालकांना जरूर सांगितले पाहिजे.

पॅरेंटल टूल्स ठरू शकतात यूजफुल
मुले मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा लॅपटॉपवर काय अ‍ॅक्सेस करत आहेत, त्यावर तुम्ही सतत नजर ठेवू शकत नाही. अशा स्थितीत पॅरेंटल कंट्रोल टूल्स तुम्हाला मदत करू शकते…

पॅरेंटल कंट्रोल-स्क्रीन टाइम अँड लोकेशन ट्रॅकर
मुलांच्या स्क्रीन टाइमला मॅनेज करण्यासाठी या टूलचा वापर करता येतो. हे अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये उपलब्ध आहे. याची खासीयत म्हणजे हे पॅरेंटल कंट्रोल फीचरसोबत येते. याच्या मदतीने वेब फिल्टरिंग, लोकेशन ट्रॅकिंग, सोशल मीडिया मॉनीटरिंग, यूट्यूब व्हिडिओ वॉच टाइम इत्यादीवर नजर ठेवते. सोबतच, स्पेसिफिक अ‍ॅप्स, साइट्सना ब्लॉक करण्यासोबतच टाइम लिमिट सेट करण्याची सुविधा मिळते. याच्या मदतीने ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होते.

फॅमिली सेफ्टी अ‍ॅप
पॅरेंटल टूलसाठी मायक्रोसॉफ्टच्या फॅमिली सेफ्टी अ‍ॅपची मदतसुद्धा घेऊ शकता. मुलांची ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीज किंवा त्यांच्यासाठी ऑनलाइन सेफ प्लेस तयार करण्यात मदत होते. यामध्ये फिल्टरच्या सुविधेसह त्या साइट्स-अ‍ॅप्स ब्लॉक करण्याचा पर्याय आहे, ज्या मुलांसाठी उपयुक्त नाहीत. येथे मुलांचा स्क्रीन टाइम सेट करण्यासह लोकेशन शेयरिंग, पॅरेंट्स कंट्रोल आणि फोन मॉनिटरिंग सारख्या सुविधासुद्धा मिळतात. यास अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईससाठी डाऊनलोड करू शकता.

गुगल फॅमिली लिंक
गुगलचे हे देखील एक उपयोगी पॅरेंटल कंट्रोल टूल आहे. याच्या मदतीने अ‍ॅप्स, गेम्स, मूव्ही इत्यादीसाठी चाइल्ड-फ्रेंडली फिल्टरचा वापर करू शकता. पॅरेंट्स आपल्या सुविधेनुसार मुलांसाठी स्क्रीन टाइम सेट करू शकतात. यामध्ये सेट केलेल्या वेळेनंतर फोन काम करणार नाही. याचे वैशिष्ट्य हे आहे की पॅरेंट्स मुलांच्या मोबाईलला रिमोटली सुद्धा कंट्रोल करू शकतात. हे गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येते.

या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे…

* पालकांनी या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे की, मुलांना कोणत्या वयात कोणता डिव्हाईस दिला पाहिजे.

* गेमिंगच्या दरम्यान जास्त वेळ स्क्रीन पहात राहिल्यास झोपेची समस्या निर्माण होऊ शकते.

* मुलांचा इंटरनेट गेम्स खेळण्याचा वेळ ठरवा. अर्ध्या तासापेक्षा जास्त त्यांना गेम्स खेळू देऊ नका.

* मुलांवर इंटरनेट गेमचा परिणाम दिसू लागतो. लठ्ठपणा, डायबिटीज अशा समस्या होऊ शकतात.

* गेमिंगचे व्यसन लागलेली मुले सोशल लाइफपासून दूर जाऊन एकटी राहू लागतात. एकटे राहाणे त्यांना आवडू लागते. काही मुले हिंसक सुद्धा वागू लागतात.

* आउटडोर गेम्सला प्रोत्साहन द्या. सध्या आउटडोर गेम्ससाठी पाठवता येणार नाही, मग घरातच फिजिकल गेम्समध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन द्या.

पालकांनी ठेवावे लक्ष
टेक एक्सपर्ट बालेंदु शर्मा दाधीच यांनी म्हटले की, आई-वडीलांनी ठरवले तर आपल्या मुलांच्या डिजिटल उपकरणात असे सॉफ्टवेयर आणि अ‍ॅप्स इन्स्टॉल करू शकतात, जे त्यांना जुगार खेळणार्‍या वेबसाइट्सवर जाण्यास रोखू शकतील. विंडोज 10 कम्प्यूटरवर फॅमिली सेफ्टी अकाउंट सक्रिय करता येते, जे अशा तमाम वेबसाईटसवर प्रतिबंध करते, ज्या मुलांसाठी नुकसानकारक आहेत. वाटल्यास सर्व्हिलस्टार आणि बेट ब्लॉकर आणि मोबाइल अ‍ॅप्समध्ये गमबन (पेड) आणि कस्टोडियोचा सुद्धा वापर करू शकता.

सर्वात जास्त जरूरी आहे की, आई-वडीलांनी सुद्धा मुलांना सांगितले पाहिजे की, अशाप्रकारच्या वेबसाइटचे कोणते धोके आहेत, मुलांसाठी या हालचाली का बेकायदेशीर आहेत आणि कशाप्रकारे त्यांचे जीवन आणि शिक्षण बरबाद होऊ शकते.

कम्प्यूटर आणि मोबाइलवर आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि इंटरनेटच्या वापरासाठी कठोर नियम लागू करा. वेळोवेळी ब्राऊझर हिस्ट्री चेक करत राहा. मुलांच्या मोबाइल फोनमध्ये कोणकोणते अ‍ॅप्स आहेत, त्यावर सुद्धा लक्ष ठेवा. मुलांच्या मोबाइलमध्ये हानीकारक अ‍ॅप्स तर नाहीत ना, किंवा असे अ‍ॅप्स त्यांनी हाईड केलेले नाहीत ना हे तपासा. मुलांकडे असलेल्या पैशांचा हिशेब ठेवा, आपल्या क्रेडिट कार्डचा हिशेब ठेवा, वॉलेट इत्यादी तपासात राहा.