निर्भयाच्या दोषींनी फाशीवर लटकण्यापुर्वी तिहार जेलमध्ये काम करून कमवले ‘एवढे’ रूपये, कोणाला मिळणार पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2012 मध्ये दिल्लीतील निर्भया घटनेने संपूर्ण देश हादरला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना काही दिवसांत ताब्यात घेत त्यांना तिहार तुरुंगात पाठविले होते, त्यांनतर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली, जी 22 मार्च 2020 रोजी शेवटच्या टप्प्यात पोहोचली. या प्रकरणात एका आरोपीस आधीच फाशी घेतली होती आणि त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने या प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झाली. जेलच्या मॅन्युअलनुसार कैदी तेथे कामही करत होते. या प्रकरणात, तुरूंगात असलेल्या तीन कैद्यांनी काम करून पैसेदेखील मिळवले होते. आता त्यांना फाशी देण्यात आल्याने हे पैसे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात येणार आहेत.

तुरूंगात असताना केले काम
अक्षय कुमार, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश कुमार या चार गुन्हेगारांना दिल्लीच्या तिहाड कारागृहात ठेवण्यात आले होते, यावेळी ते तुरूंगातील नियमाप्रमाणे कामही करीत होते, या कामाच्या बदल्यात त्यांना तुरूंग व्यवस्थापनाकडून नियमित पैसेही मिळत होते. ही रक्कम त्याच्या नावावर जमा केली जात होती.

कुटुंबाकडे पैसे देण्यात येतील
तिहार जेल प्रशासनाच्या माहितीनुसार निर्भयाच्या दोषींनी तुरूंगात काम करून एकूण एक लाख 37 हजारांची कमाई केली होती. या चार दोषींपैकी मुकेशने कोणतेही काम केले नव्हते. बाकीचे तीन अक्षय, पवन आणि विनय येथे काम करत राहिले. अक्षयने अनुक्रमे 69 हजार रुपये, पवन 29 हजार रुपये आणि विनयने 39 हजार रुपये कमावले. आता त्याचे मिळवलेले पैसे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिले जातील. याशिवाय तुरुंगात जमा केलेले त्यांचे कपडे व इतर वस्तू त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

7 वर्षानंतर न्याय मिळाला
फासावर लटकविण्याच्या आधी हे तिघे 7 वर्ष, तीन महिने आणि 3 दिवस तुरूंगात होते, शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता या चौघांना तिहार जेल क्रमांक -3 मध्ये एकत्र फाशी देण्यात आली. यापूर्वी या खटल्याची शेवटची सुनावणी रात्री 3 वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात झाली होती, ज्यात न्यायाधीशांनी वकिलांचा कोणताही युक्तिवाद स्वीकारण्यास नकार दर्शविला आणि सांगितले की शिक्षेमध्ये कोणतीही सुधारणा होऊ शकत नाही.