NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NDA Cadet Dies in Pune | पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा (NDA Cadet Dies in Pune) मृत्यू झाला. कॅडेट मोहम्मद सुलतान अहमद Mohd Sultan Ahmed (वय 21) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा कॅडेट मालदीव (Maldives) येथील असून पुण्यातील एनडीएत (Pune NDA) सध्या तो प्रशिक्षण घेत होता.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी जोश रन चे (Josh Run) आयोजन करण्यात आले होते. ही 12 किमी धावण्याची स्पर्धा होती. त्यात मोहम्मद सहभागी झाला होता. धावताना त्याला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तो कोसळला (Collaps). त्याला तातडीने एनडीएच्या रुग्णालयात (NDA Hospital) नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू   झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मोहम्मद हा 12 मार्च रोजी एनडीएच्या 145 व्या तुकडीत दाखल झाला होता. या प्रकरणी एनडीए प्रशासनातर्फे चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तसेच मालदीव वकिलातीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याची माहिती एनडीए प्रशासनाने दिली.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad) यांनी सांगितले. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) कलम 174 नुसार नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल? जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Maldives cadet dies while training at NDA in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update