NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NDA Exam for Women | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले आहे की, महिला राष्ट्रीय संरक्षण अकादमीची प्रवेश परीक्षा (NDA Exam for Women) देऊ शकतात. जस्टिस संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी कुश कालरा यांच्याद्वारे दाखल याचिकेवर अंतरिम आदेश पारित केला आहे.

या याचिकेत महिला उमेदवारांना एनडीए परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले आहे की, महिलांना परीक्षेला बसू न देणे भारताच्या संविधानाच्या कलम 14, 15, 16 आणि 19 चे उल्लंघन आहे.

लिंगाच्या आधारावर केला जातो भेदभाव
याचिकेत पुढे म्हटले आहे की, अधिकारी बारावी पास अविवाहित पुरुष उमेदवारांना ‘राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि नौदल अकादमीच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देतात, परंतु पात्र आणि इच्छुक महिला उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी केवळ लिंगाच्या आधारवर देत नाहीत. यासाठी संविधानांतर्गत कोणतेही योग्य कारण सुद्धा दिले जात नाही.

 

प्रवेशापासून ठेवले जाते वंचित

कोर्टात याचिकाकर्त्याची बाजू सिनियर अ‍ॅडव्होकेट चिन्मय प्रदीप शर्मा यांनी अधिवक्ता मोहित पॉल, सुनैना आणि इरफान हसीब यांच्यासोबत मांडली. याचिकेत म्हटले आहे की, योग्य आणि इच्छुक महिला उमेदवारांना लिंगाच्या आधारावर राष्ट्रीय संरक्षण अकादमीत प्रवेशाच्या संधीपासून वंचित ठेवले जाते.

याचिकेत हे सुद्धा म्हटले आहे की, महिलांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रशिक्षित न करणे
आणि देशाच्या सशस्त्र दलांमध्ये स्थायी कमीशन अधिकारी म्हणून केवळ लिंगाच्या आधारावर नियुक्ती
देण्यास मनाई करणे मुलभूत अधिकाराचे हनन आहे आणि हे भारतीय संविधानाच्या कक्षेत न्यायोचित नाही.

Web Title :- NDA Exam for Women | women can sit for national defence academy entrance exams says supreme court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti Corruption Pimpri Chinchwad | 9 लाखाचे लाचेचे प्रकरण ! पिंपरी-चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह चौघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळ्यात’

Gold Rate Today | विक्रमी स्तरापासून 8,700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, खरेदीची हीच संधी! जाणून घ्या आजचे दर

Ayurvedic Herbs | ‘या’ आयुर्वेदिक औषधी वनस्पती आपल्या शरीराला आतून निरोगी ठेवतात, जवळपास देखील येणार नाही आजार; जाणून घ्या