महाराजांचे नाव घेण्याची राज्यकर्त्यांची लायकी नाही : अमोल कोल्हे

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन लोकांना उल्लू बनविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे महाराजांचे नाव घेण्याची राज्यकर्त्यांची लायकी नाही अशी टीका अभिनेते अमोल कोल्हे यांनी केली. नारायणगाव येथील आयोजित सभेत त्यांनी ही टीका केली.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. दोन दिवसांआधीच अभिनेते अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला राम राम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी अभिनेते अमोल कोल्हे यांचा नारायणगाव येथे स्वागत मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी, ‘देशात सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला सकारात्मक वळण देण्याची क्षमता केवळ शरद पवार यांच्यात आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात आपण प्रवेश केला,’ ‘देशातील राज्य हे लोकांचे राज्य नाही, तर हे केवळ चार उद्योगपतींचे राज्य आहे. मोदी यांनी नोटाबंदी केली. दहशतवाद्यांनी काळा पैसा वापरू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. परंतु, नोटाबंदीनंतर देखील दहशतवादी कारवाया वाढल्या. शिरूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रसेचा उमेदवार निवडून आणा. मग तो कोणीही असो. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, शिवरायांचे नाव घेऊन लोकांना उल्लू बनविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे महाराजांचे नाव घेण्याची राज्यकर्त्यांची लायकी नाही अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवा नेते अतुल बेनके, माजी आमदार विलास लांडे, दिलीप ढमढेरे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम आदी उपस्थित होते.

माझे ‘त्या’ पोशाखातील फोटो फ्लेक्सवर लावू नका : अमोल कोल्हे