मोदींच्या मंत्रिमंडळात यंदा ‘या’ दोन बड्या नेत्यांना स्थान नाही ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळल्यानंतर आता भाजपची सरकारस्थापनेची जय्यत तयारी सुरु झाली आहे. नवी दिल्ली येथे आज संसदभावनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची बैठक होते आहे. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवखासदारांना संबोधित करणार आहेत. या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितिशकुमार यांच्यासोबतच आणखीही नेते उपस्थित आहेत.

दरम्यान या महत्वपूर्ण बैठकीत खातेवाटपाचाही निर्णय होऊ शकतो असे बोलले जात आहे. कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार , एनडीएमधल्या घटकपक्षांना किती मंत्रिपदं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अमित शहा याबाबत घटकपक्षांशी चर्चा करणार आहेत. शिवसेना आणि जेडीयूच्या खासदारांना महत्त्वाची मंत्रिपदं मिळू शकतात.

‘या’ दोन बड्या नेत्यांचा पत्ता कट
माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या दोन बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात यंदा स्थान मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण अरुण जेटली यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत अमृतसरहून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य बनले. तर सुषमा स्वराज यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.