राम मंदिराबाबत रामदास आठवलेंचा सर्वांना ‘सबुरी’चा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना राम मंदिरच्या मुद्यावरुन आक्रमक झाली असताना रामदास आठवले यांनी मात्र सबुरीचा सल्ला दिला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की सगळ्यांनी राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांना आयोध्येला नेऊन 16 जूनला रामाचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. तर त्यांच्याच युतीतील असलेल्या रामदास आठवले यांनी मात्र सर्वोच्च्य न्यायालयाच्या निर्णयांची वाट पाहावी असे सांगत धीर धरण्याचा सल्ला दिला.

आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आयोध्येला चालले आहेत तर मी त्यांचे स्वागत करेल मात्र त्यांच्या या दौऱ्याचा राम मंदिरच्या निर्माणावर कोणताही परिणाम होणार नाही. आठवले पुढे असे ही म्हणाले की, राम मंदिराचा मध्यस्थीच्या माध्यमातून काही उपाय निघत असेल तर ते उत्तम राहिलं. आलाहबादच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच सर्वोच्च्य न्यायालयाचा निकाल लागेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

देशातील हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन राम मंदिर उभारले गेले पाहिजे. माझे कायम असे मत राहिले आहे की सगळ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी असे देखील रामदास आठवले म्हणाले. राम मंदिर प्रकरणात जर कोणी मध्यस्थी केली आणि सकारात्मक निर्णय आला तर समजातील सगळ्या वर्गात आपापसात सदभावना निर्माण होईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय येणार नाही तो पर्यत कोणीही घाई करु नये असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.