एनडीए ला सोडचिठ्ठी ; अकाली दलाचा ‘एकला चलो रे’चा नारा

कुरुक्षेत्र: वृत्तसंस्था
एनडीएला सोडचिठ्ठी देत अकाली दलाने ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या अाधीच भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का मानला जातो आहे. शिरोमणी अकाली दलाने हरियाणात लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकत्र न लढवण्याचा निर्णय घेतला असून, अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी रविवारी ही घोषणा केली.
[amazon_link asins=’B01MUUPL3Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1dd1ca56-a45a-11e8-a4f6-d5899f2de094′]
 पिपली नगर येथील एका सभेला संबोधित करत असताना,आम्ही पंजाबमध्ये वचन पूर्ण केले. आता हरियाणातील लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याची आम्ही जबाबदारी घेणार आहोत. यापुढे हरियाणात एक नवा इतिहास निर्माण करण्यासाठी अकाली दलाच्या झेंड्याखाली सर्व पंजाबमधील लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन बादल यांनी केले. एकदा का तुम्ही अकाली दलाच्या नेतृत्वाखाली एकत्र आला की सत्तेपासून तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले.
अकाली दलाचा हा निर्णय भाजपसाठी आणि एनडीएसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. याआधीच्या सर्व निवडणुकीत भाजप सोबत त्यांनी निवडणुका लढवल्या होत्या. गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुका भाजप आणि अकाली दलाने एकत्र लढवल्या होत्या. त्यात त्यांचा पराभव झाला होता.