मागील दोन वर्षात देशातील तब्बल 500 एटीएम मशीन ‘गायब’!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात एटीएममध्ये बऱ्याचदा कॅशच उपलब्ध नसल्याचे प्रकार घडत असताना आता आरबीआय च्या आवाहलातून नवा खुलासा झाला आहेत. मागील दोन वर्षात देशातील किमान 500 एटीएम कमी झाले आहेत. असा दावा या आवाहलात करण्यात आला आहे. हा धक्कादायक आवाहल बेंचमार्किंग इंडिया पेमेंट सिस्टम या नावाने जारी करण्यात आला आहे. यानुसार 2017 च्या शेवटी जेथे एटीएम मशीनची संख्या 2 लाख 22 हजार 300 होती तेथे आता 31 मार्चला ती कमी होऊन 2 लाख 21 हजार 703 झाली आहेत. या बरोबरच भारतात जेवढे कॅश सर्कुलेशन होते. त्यामानाने एटीएमचा वापर खूपच कमी आहे.

भारतात एटीएमच्या संख्येत भले की कमतरता होत आहे, परंतू 2012 पासून 2017 एटीएम लागवण्याच्या स्पीडमध्ये भारत फक्त चीनच्या मागे होता. आवाहलानुसार 6 वर्षात (2012-2017) एटीएमची संख्या दुप्पट झाली होती. 2012 मध्ये 10 हजार 832 एवढ्या लोकांमागे 1 एटीएम होते. तर 2017 साली 5 हजार 919 लोकांमागे 1 एटीेएम होते. जर लोकसंख्येचा विचार केला तर ही आकडेवारी खूप कमी आहे.

महत्वाची बाब अशी की, एटीएमची संख्या कमी झाली असली तरी ट्रानजेक्शनची संख्या वाढताना दिसत आहे. कॉन्फिडेरेशनल ऑफ एटीएम इंडस्‍ट्रीज कल्पना दिली होती की, पुढील वर्षी देशातील एटीएमची संख्या कमी होईल. सीएटीएमआईने सांगितले होते की, देशात 2 लाख 38 हजार एटीएम आहेत, ज्यातील तब्बल 1 लाख 13 हजार मशीन मार्च 2019 पर्यंत बंद होतील.

आरबीआयच्या कडक नियम आणि अटींमुळे बँका आणि एटीएम मशीन पुरवणाऱ्या संस्थाना बदल करावे लागत आहेत. यावर एटीएम आणि बँकांना मोठी खर्च करावा लागत आहे. यामुळे एटीएम मशीन्सची संख्या कमी होत चालली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like