लडाख बॉर्डरवर तणाव ! भारतीय आणि चीनी सैन्यात ‘जुंपली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव वाढला असून दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर बुधवारी हा प्रकार घडला. या परिसरातील एक तृतीयांश भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे.

या कारणामुळे धक्का-बुक्की –

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य गस्त घालत असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक समोर आल्यानं तणाव निर्माण झाला. या भागातील भारतीय जवानांच्या उपस्थितीचा चिनी सैन्यानं विरोध केला. यानंतर दोन्ही देशाचे सैनिक एकमेकांना भिडले व त्यांच्यात धक्काबुक्की झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत दोन्ही बाजूच्या सैन्यांमधील संघर्ष सुरू होता.

2017 मध्येही संघर्ष झाला होता –

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील (एलएसी) दोन्ही बाजूंमध्ये अशा घटना घडतात. पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर 15 ऑगस्ट 2017 रोजी दोन्ही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता. त्याच वर्षी सिक्कीम-भूटान-तिबेट सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बरेच दिवस तणाव होता.

डोकलाम वाद –

दोन वर्षांपूर्वी, 2017 मध्ये भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये मोठा वाद झाला होता. 73 दिवस एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर सैनिकांनी माघार घेतली होती. डोकलाममध्ये चिनी सैन्याने रस्त्याचे बांधकाम सुरू केले. भूतानला मदत करण्यासाठी भारतीय सैन्य डोकलामला पोहोचले होते आणि रस्त्याचे बांधकाम थांबवले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like