अर्णब गोस्वामींच्या बाल्कनीत बसून ‘ते’ गाणं ऐकण्याची इच्छा, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडीवर टीका करणं सुरू केलं आहे. अर्णब यांना रायगड पोलिसांनी अलिबाग कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णब यांच्या अटेकच्या वेळी घरात सुरू असलेल्या गोंधळाचं दृश्य सर्वांनीच पाहिलं आहे. अर्णब यांच्या पत्नी आणि मुलं ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. सर्वांनी त्यांचं घरही पाहिलं आहे. यानंतर आता वरिष्ठ पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) हेही अर्णब यांचं घर पाहून अवाक् झाले आहेत. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी याबाबत उल्लेख केला आहे. या प्रकरणावर त्यांनी पोस्टच्या माध्यमातून भाष्य केलं आहे.

अर्णब प्रकरणावर बोलताना रवीश कुमार म्हणाले, “जुनी प्रकरणं पुन्हा का ओपन करण्यात आली हे पोलिसांनी स्पष्ट करायला हवं. जेणेकरून अर्णब यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच पोलिसांकडून अटक झाली आहे हे सर्व लोकांना कळू शकेल.”

पुढं बोलताना रविश कुमार ते म्हणाले, “अर्णब गोस्वामी यांची पत्रकारिता रेडिओ रवांडा चं उदाहरण आहे. ज्याच्या उद्घोषानं जनतेला चिथावणी दिली आणि लाखो लोक मारले गेले. अर्णब यांनी कधीच्या मॉबच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या लोकांची बाजू घेतली नाही. गेल्या 4 महिन्यात ते जे करत आहेत त्यावर न्यायालयानंही भाष्य केलं आहे. तेव्हा कोणताही मंत्री, न्यायालय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहे असं का म्हणाला नाही ?” असा सवालही त्यांनी केला आहे.

अर्णब यांच्या घराचा उल्लेख करत रवीश कुमार लिहितात की, “अर्णब यांचं घर पाहून मी अवाक् झालो. रोज 6000 शब्द टाईप करून मी गाझियाबादच्या घरात राहतो, ज्यात खुर्ची लपवण्यासाठीही बाल्कनी नाही. अर्णब यांचं घर किती सुंदर आहे. अर्णब यांच्या सुंदर घराच्या व्हिज्युअलसमोर मी असंघटित क्षेत्रातील एका मजुराप्रमाणे चुपचाप उभा राहिलो.”

पुढं ते लिहितात, “अर्णब गोस्वामी जेव्हा कारागृहातून घरी येतील, सर्वप्रथम तर पोलिसांनी त्यांना लवकरात लवकर सोडावं. मी तर असंच म्हणेल की, काही दिवसांची सुट्टी घेऊन त्यांनी आपल्या या सुंदर घराचा आनंद घ्यावा. जर ते या घराचा आनंद घेऊ शकत नसतील तर त्यांनी पाहुणा म्हणून मला आमंत्रण द्यावं. मी काही दिवस तिथं थांबेन. सकाळी त्यांच्या घरची कॉफी घेईन. तसं तर माझ्या घरी मी चहाच पितो परंतु आपण जेव्हा श्रीमंतांच्या घरी जाता तेव्हा आपली टेस्ट बदलावी. त्यांच्या घराच्या बाल्कनीत बसून अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्याला सलाम मला पाठवायचा आहे आणि बॉर्डर सिनेमातील (Border (1997 film)) गाणं फुल व्हॉल्युममध्ये ऐकायचं आहे.

ऐ जाते हुए लम्हों, ज़रा ठहरो, ज़रा ठहरो
मैं भी तो चलता हूँ, ज़रा उनसे मिलता हूँ
जो इक बात दिल में हैं, उन से कहूँ
तो चलूँ, तो चलूँ…”