न्यू फरक्का एक्सप्रेसचे ६ डबे घसरले

रायबरेली :  वृत्तसंस्था

दिल्ली-मालदा न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना हरचंदपूर स्थानकापासून ५० मीटर अंतरावर बुधवारी सकाळी घडली. अपघाताची दृश्ये भीषण असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’26f7a5d3-cc3f-11e8-a540-93a6976416b4′]

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि लखनौ तसेच वाराणसी येथून एनडीआरएची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचा आणि लहान मुलीचा समावेश आहे.

रेल्वेरूळालगत आढळला बालकाचा मृतदेह, नरबळीचा संशय

रूळाला तडे गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते. अपघातानंतर घटनास्थळावर भितीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळावर पोहोचले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी रेल्वेचे उपव्यवस्थापक, पोलीस महासंचालक, आरोग्यविभाग आणि एनडीआरएफला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहे.

[amazon_link asins=’B00QJWQW6E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’134c97ab-cc40-11e8-956a-f5c91ea85ccd’]