लोकसभा २०१९ : नवनिर्वाचित लोकसभेतील निम्मे खासदार ‘गुन्हेगारी’ पार्श्वभूमीचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २०१९ च्या लोकसभेत गुन्हेगारी पार्श्वभूमी व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खासदारांची संख्या वाढली आहे. सदोष मनुष्यवध, चोरी यांच्यासारख्या गुन्ह्यांचा यात समावेश दाखल आहे. धक्कादायक बाब म्हणजे संसदेतील जवळपास निम्मे सदस्य गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर काँग्रेसचे खासदार डेन कुरिअकोसे यांच्याविरोधात सर्वाधिक म्हणजे तब्बल २०४ गुन्हे दाखल आहेत. निवडणूक लढताना उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ च्या लोकसभेतील ५३९ सदस्यांपैकी २३३ सदस्यांवर गुन्हे दाखल आहेत. यातील जवळपास १५९ सदस्यांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांविरोधातील गुन्हे यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये हेच प्रमाण १८५ होत तर २००९ मध्ये हेच प्रमाण १६२ होत.

संसदेमध्ये भाजपचे मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे तब्बल ८० टक्क्यांहून अधिक खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर काँग्रेसचे ५७ टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर द्रमुकच्या ११, तृणमूलच्या ९, तर भाजपाच्या ११६ खासदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे.