Coronavirus : गेल्या 20 दिवसात जगात ‘कोरोना’चे 58 लाख नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : मागील 7 महिन्यांपासून कोरोना व्हायरस महामारीचा प्रकोप निरंतर सुरू आहे. संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ यावर परिणामकारक वॅक्सीन विकसित करण्यात गुंतले आहेत. परंतु, अद्याप ती ट्रायलच्या टप्प्यातच पोहचली आहे. तर दुसरीकडे काही असेही देश आहेत, जेथे प्रकरणे कमी झाली असताना ती पुन्हा वाढण्याचे संकट उभे राहिले आहे.

रॉयटर्सच्या आकड्यानुसार, संपूर्ण जगात या व्हायरसच्या संसर्गाची आतापर्यंत 258232272 प्रकरणे समोर आली आहेत. तर यामुळे 856,876 लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि 17,136,240 रूग्ण बरेदेखील झाले आहेत. हे आकडे खुप आश्चर्यकारक आहेत. कारण 12 ऑगस्टला संपूर्ण जगात कोरोनाची दोन कोटी प्रकरणे होती. अशा प्रकारे मागील 20 दिवसात जगात कोरोनाची 58 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

रॉयटर्सनुसार, अमेरिकेमध्ये सर्वात जास्त लोक कोविड-19 ने संक्रमित आहेत. येथे एकुण संक्रमितांची संख्या 60 लाखांच्या पुढे गेली आहे. रॉयटर्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये यावेळी कोरोना व्हायरसचे 6,089,955 रूग्ण आहेत. 184,719 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2,492,084 रूग्ण बरे झाले आहेत.

लॅटिन अमेरिकेत कोरोनाचे 7,417,263 रूग्ण समोर आले आहेत, आणि 280,051 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे 5,684,733 रूग्ण बरे सुद्धा झाले आहेत. तर नॉर्थ अमेरिकेत 6,219,571 संक्रमित रूग्ण आहेत, तर 193,860 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय येथे 2,606,864 रूग्ण बरे देखील झाले आहेत. तसेच आशियामध्ये कोरोना व्हायरसमुळे संक्रमित एकुण रूग्णांची संख्या 5,326,526 पर्यंत पोहचली आहे. यामुळे आतापर्यंत 99,436 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4,149,114 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

युरोपमध्ये कोरोनाच्या एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 3,704,237 आहे. याशिवाय 208,233 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2,044,635 रूग्ण बरे झाले आहेत. मध्य आशियात कोरोनाचे 1,875,309 रूग्ण आहेत आणि 44,594 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,628,202 रूग्ण बरे झाले आहेत. अफ्रीकामध्ये कोरोनाचे 1,260,769 रूग्ण आहेत आणि 30,016 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सुमारे 999,106 रूग्ण बरे झाले आहेत. ओशियानामध्ये कोरोनाची आतापर्यंत 28,597 प्रकरणे समोर आली आहेत. येथे 686 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 23,586 रूग्ण बरे झाले आहेत. जर संपूर्ण जगातील संक्रमित प्रमुख 5 देशांबाबत बोलायचे तर यामध्ये अमेरिकेसह ब्राझीलल, भारत, रशिया आणि दक्षिण अफ्रीका यांचा समावेश आहे.

6 मार्चला संपूर्ण देशात या जीवघेण्या व्हायरसची प्रकरणे 10 लाख होती, जी 18 मार्चला वाढून 20 लाखांच्या पुढे गेली होती. ती 28 एप्रिलला 30 लाख आणि 9 मेरोजी 40 लाख झाली होती. 20 मेरोजी जगात या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे 50 लाख आणि 29 मेराजी 60 लाख झाली होती. 7 जूनला ती 70 लाख आणि 14 जूनला ती 80 लाखांवर पोहचली. 21 जूनला जगात कोरोना रूग्णांची संख्या 90 लाख आणि 27 जूनला कोरोना रूग्णाचा आकडा एक कोटींच्या पुढे गेला होता.

1 जुलैला कोरोनाची प्रकरणे 1 कोटी 10 लाख आणि 8 जूनपर्यंत यामध्ये 10 लाख प्रकरणे आणखी वाढली. अशाच प्रकारे 12 जुलैरोजी कोरोनाची प्रकरणे संपूर्ण जगात 1 कोटी 30 लाख होती, आणि 17 जुलैला ती 1 कोटी 40 लाखांवर पोहचली होती. 21 जुलैला या व्हायरसने संक्रमित रूग्णांचा आकडा दिड कोटींच्या पुढे गेला होता. 21 जुलैला तो 1 कोटी 60 लाख, 29 जुलैला 1 कोटी 70 लाख, 1 ऑगस्टला 1 कोटी 80 लाख, 6 ऑगस्टला 1 कोटी 90 लाख आणि 12 ऑगस्टला कोरोनाची संपूर्ण जगात 2 कोटी प्रकरणे झाली होती. अशाप्रकारे मागील 20 दिवसांत जगात कोरोनाची 58 लाखांपेक्षात जास्त प्रकरणे समोर आली आहेत.