समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशामध्ये निर्भया घटनेनंतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत देशातील कायदे अधिक कडक केले. मात्र, तरीही देशात बलात्काराच्या घटना होत आहेत. ही निंदनीय बाब असून या घटना थांबविण्यासाठी समाजाच्या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे, असे मत देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पुण्यात आज केले.

यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मंत्री छगन भुजबळ, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजूमदार, कुलगुरू रजनी गुप्ता, प्र-कुलगुरू तथा विद्यापीठाच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, कुलसचिव एम.जी. शेजूल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सुवर्णपदक पदवी प्रदान केली.

समाजाची मानसिकता बदलण्यासाठी शालेय जीवनापासूनच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चांगले मुल्य रुजविण्याची आवश्यकता असून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीचे, संस्कृतिचे परांपरागत चालत आलेल्या गोष्टी जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज (रविवार) केले. लवळे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळाव्या पदवीदान समारंभा प्रसंगी व्यंकय्या नायडू बोलत होते.

व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, आपल्या आई-वडिलांचा, गुरुजनांचा, आपल्या बहिणींचा आदर ठेवावा हे मुलांना लहान पणापासूनच शिकवले पाहिजे. समाजात गुरुचे स्थान महत्त्वाचे असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना योग्य मार्ग शिक्षकांनी दाखवला पाहिजे. प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते ते शिक्षण. तसेच समाजातील राक्षसांना संपवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती व प्रशासकीय कौशल्यांची आवश्यता असल्याचे, त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com