भारतमातेच्या रक्षणासाठी संरक्षण प्रबोधिनी मध्ये जाण्याची गरज: फ्लायिंग पायलट प्रतीक यादव 

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन

प्रथम देशहित नंतर नोकरी आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करत भारतमातेच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत जाण्याची गरज असल्याचे मत फ्लायिंग पायलट प्रतीक यादव यांनी व्यक्त केले. “इयत्ता ९वी ,१०वी च्या अभ्यासक्रम मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या संरक्षण शास्त्र या विषयाची ओळख व संरक्षण क्षेत्रातील सेवेच्या संधी”, या विषयावर आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्यूकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम  स्कूल आणि जुनिअर कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात यादव बोलत होते.

भारतमातेच्या रक्षणासाठी संरक्षण प्रबोधिनी मध्ये जाण्याची गरज: फ्लायिंग पायलट प्रतीक यादव

यावेळी माजी वायुदल अधिकारी शंकरराव यादव व मा.फार्मासिस्ट आनंद साळुंखे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात येण्यासाठी उपयुक्त माहिती,शैक्षणिक अहर्ता ,परीक्षेचे स्वरूप ,निवड प्रक्रिया ,शारीरिक ,बौद्धिक मानसिक तयारी यावर ओम कुंभार, ओंकार काळे, वैभवी मुरूमकर, सेजल लोढा, वैदेही नायर या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप प्राचार्या वर्षा शर्मा उपस्थित होत्या.

[amazon_link asins=’B072XP1QB7,B01NAKR1Z9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68839672-88cc-11e8-9e0e-9f28bf80c938′]