आता आरोग्य सेतु App वर मिळेल Co-WIN व्हॅक्सीनची माहिती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : भारताचे कोविड-19 ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतुला को-विन पोर्टलसोबत इंटीग्रेट केले आहे. ज्यामुळे यूजर्स सहजपणे आपले व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकतात. रियल टाइम बेसिसवर व्हॅक्सीनेशनला ट्रॅक करण्यासाठी केंद्र सरकारने कोविड व्हॅक्सीन इंटेलीजन्स नेटवर्क किंवा को-विन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलप केले आहे.

आरोग्य सेतु अ‍ॅपने ट्विटरवर एक ट्विट करून याबाबतची माहिती दिली की, जर तुम्हाला कोविड-19 व्हॅक्सीनेशनशी संबंधीत कोणतीही माहिती हवी असेल तर को-विन डिटेल्स सध्या आरोग्य सेतु अ‍ॅपवर लाइव्ह आहेत. जर तुम्हाला कोविड-19 चा एक डोस दिलेला असेल तर आपणे येथे जाऊन व्हॅक्सीनेशनची माहिती, को-विन डॅशबोर्डवर पाहू शकता आणि व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.

 

 

 

 

काय आहे को-विन?
को-विन भारतातील नागरिकांसाठी एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे ते स्वत:ला रजिस्टर करून व्हॅक्सीनेशनचा स्लॉट बुक करू शकतात. को-विन पोर्टलला आरोग्य आणि केंद्र सरकारने युनायटेड नॅशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजे युएनडीपीचा सपोर्ट घेऊन हे सुरू केले आहे. अ‍ॅपमध्ये एकुण 5 मॉडल्स आहेत.

असे काम करते अ‍ॅप?
1. सर्वप्रथम व्हॅक्सीनसाठी रजिस्टर करावे लागेल. हे मोबाइल नंबर किंवा आधार नंबरसह करू शकता.

2. यानंतर तुम्हाला व्हॅक्सीन दिली जाईल. यासाठी व्हॅक्सीनची तारीख आणि ठिकाण दिले जाईल.

3. नंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिला जाईल. प्रत्येक व्हॅक्सीनेशननंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिले जाईल.